Wednesday, 8 July 2015

युटीएस अॅप: पश्‍चिम रेल्वेवर आजपासून मोबाईल तिकीट उपलब्ध!


तिकिटांच्या खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी पश्‍चिम रेल्वेवर आजपासून दि.८ जुलै   लोकलच्या पेपरलेस मोबाईल तिकिटिंग योजनेचा प्रारंभ केलाय. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रेल भवन नवी दिल्ली इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचं उद्घाटन होईल.  या योजनेमुळं आता मुंबईकरांना तिकिट खिडक्यांवर रांगा लावाव्या लागणार नाहीत. तिकीट बुक करण्यासाठी UTS हे मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल.


मोबाईलवरून तिकीट कसं बुक करावं?
1. UTS हे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

2. डाऊनलोड केल्यानंतर साईन अप करून तुमची माहिती भरा

3. तुम्हाला ई-वॉलेट बनवण्यासाठी एक आयडी मिळेल.

4. त्यानंतर त्वरीत किंवा सामान्य बुकिंगचा पर्याय निवडा

5. तिकीट आरक्षित करण्यासाठी ई-वॉलेटमध्ये ऑनलाईन किंवा कुठल्याही रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊन्टरवर रिचार्ज करता येईल.

6. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे ई-वॉलेटचा टॉप-अप रिचार्ज करता येईल. ई-वॉलेट रिचार्ज करण्यासाठी https://www.utsonmobile.indianrail.gov.in इथं क्लिक करा

7. अॅपवरुन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना तिकीटाचं प्रिंटआऊट घेण्याची आवश्यकता नाही. मोबाईलवरुन सॉफ्टकॉपी दाखवणं पुरेसं आहे.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...