Thursday, 10 September 2015

हाइकवर होणार आता मोफत ग्रृप कॉलिंग

        सध्या सोशल साईटसपेक्षा मॅसेंजर हे अधिक लोकप्रिय होत चालले आहेत. व्हॉटस्अप हे सध्या लोकप्रिय मॅसेंजर आहे. याचे एक वर्षासाठी 56 रूपये मोजावे लागतात. तसेच त्यामध्ये वापरण्यात येणारे स्टीकर्स हे साधे आहेत अ‍ॅनिमेटेड नाहीत. परंतु हाईक हे भारतीय मॅसेंजर चक्क फ्री आहे परंतु लोक ते वापर नाहीत. शिवाय त्यामध्ये वापरण्यात येणारे स्टीकर्स देखील अ‍ॅनिमेटेड व भरपूर आहेत. लोकांचे कसे असते एक मेंढी चालली की सर्व तिच्या मागे जातात लोकांचे पण तसेच आहे. सर्वांनी व्हॉटस पेक्षा हाईक वापरले पाहिजे. त्यासाठी हाईक हे नवनवीन युक्त्या शोधून काढत असते. तसेच त्यांनी आता  हाईक या मॅसेंजरवर मोफत ग्रुप कॉलिंग हे फिचर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. ताज्या अपडेटमध्ये याची सुविधा मिळणार आहे.
         
हाईक हे अत्यंत वेगाने लोकप्रिय होणारे मॅसेंजर म्हणून ख्यात आहे. व्हाटसऍप व व्हायबर, लाईन आदी विश्‍वविख्यात मॅसेंजरमध्येही नसणार्‍या अनेक उत्तमोत्तम सुविधा यात देण्यात आल्या आहेत. विशेषत: अलीकडच्या काळात तर हाईकने आपल्या युजर्सला नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटाच लावला आहे. काही दिवसांपुर्वीच यावर ब्रेकिंग न्यूजची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. यानंतर तब्बल पाच हजार स्टीकर्सचा खजिनादेखील देण्यात आला आहे. आता ताज्या अपडेटमध्ये मोफत ग्रुप कॉलिंग ही सुविधा दिलेली आहे.
हाईकमध्ये आधी मोफत कॉलिंग हे फिचर असले तरी यासाठीची पध्दत ही काहीशी क्लिष्ट होती. आता एका टॅबवर क्लिक करून कुणीही आपल्या ग्रुपमधील 100 सदस्याशी मोफत कॉलिंग करू शकतो. 

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...