Wednesday, 23 September 2015

आपल्याला फोल्डरला आपले फोटो कसा चिपकवयाचा

आज मी आपल्याला फोल्डरला आपले फोटो कसा चिपकवयाचा हे सांगणार आहे.  प्रत्येकाला वाटते की आपण काहीतरी वेगळे आपल्या काम्प्युटरमध्ये करीत रहावे. व आपले काम्प्युटर हे इतरापेक्षा वेगळे दिसावे. आपल्या पीसी मध्ये अनेक फोल्डर्स असतात, पण तुम्हाला नेहमी स्वतःचे पर्सनल फोल्डर इतरांपेक्षा वेगळे दिसावे अशी इच्छा असते. जर तुम्ही काही फोल्डर्सला इतरांपेक्षा वेगळा लुक देऊ इच्छित असाल तर तुमचा आवडता फोटो तुम्ही विंडोज आयकॉन म्हणून सेट करू शकता. आयकॉन हे एक छोटे चित्र असते, जे एखादी फाइल किंवा प्रोग्रामचे प्रतिनिधित्व करते आणि त्याचे Extenion .ico  असते. यात एक इमेज असते, जी विविध आकार आणि कलर डेप्थ मध्ये असते. याचा आकार हा 48 x 48, 32 x 32, 24x24, आणि 16 x 16 मध्ये मोजतात.पण घाबरू नका, स्वत: च्या इमेजचा आयकॉन तयार करण्याची प्रोसेस खुप सोपी आहे. सध्या स्वतःचा आयकॉन करण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी असंख्य सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. पण ऑनलाइन टूलचा वापर करून आयकॉन तयार करणे ही सर्वात सोपी आणि जलद प्रोसेस आहे आणि यासाठी तुम्हाला कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागत नाही आणि त्यात कसे काम करावे हे शिकावे देखील लागत नाही.


हे करण्यासाठी काही ऑनलाइन टूल्स उपलब्ध आहेत ज्यात आयकॉन तयार आणि इडिट करता येतात 



   येथे तुम्हाला फक्त तुमची इमेज अपलोड करायची आहे, Format  सेट करायचा आहे आणि 16x16, 32x32,  48x48 हे तिन्ही आकार सिलेक्ट करायचे आहेत.नंतर ही तयार झालेली .ico फाइल डाउनलोड करा.
  आता ज्या फोल्डरचा आयकॉन बदलायचा आहे, त्यावर राइट क्लिक करून Properties सिलेक्ट करा.Customize tab मधून Change Icon बटनावर क्लिक करा.



  Browse बटनाला क्लिक करून डाउनलोड केलेल्या .ico फाइलला सिलेक्ट करा. बस्स!



सुचना - आयकॉनचा आकार हा नेहमी Square असतो आणि म्हणून शक्यतो यासाठी इमेजसुध्दा स्क्वेअर सिलेक्ट करा. पण जर इमेज स्क्वेअर नसेल तर हि इमेज स्क्वेअर करण्यासाठी येथे रिक्त जागा रिकाम्या जागेने भरली जाईल.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...