Friday, 30 October 2015

फ्लिपकार्ट आता ऑफलानही

      जगातील सध्या सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी असलेल्या अलीबाबा या कंपनीला पछाडले आहे. फ्लिपकार्ट या कंपनीने कमी दिवसात नाव  कमिवल आहे. आणि त्यांची सर्व्हिसही तशीच आहे.  आता 13  सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान  बिल बिलियन डे सेलमध्ये यांनी 5 दिवसात  दोन हजार कोटींचा व्यवसाय करत अव्वल स्थान पटकाविले आहे.  लोकांचा हा प्रतिसाद बघता कंपनीने ऑनलाईन बरोबर ऑफलाईनही व्यवसाय करण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीने  आता स्पाईस हॉटस्पॉट या कंपनीसोबत करार करून ऑफलाईन विक्रीतही पदार्पण केले आहे. फ्लिपकार्टने व्यवसायवाढीसाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या आहेत.    

  आता याचेच पुढचे पाऊल म्हणजे या कंपनीने गॅजेट विक्रीत अग्रेसर असणार्‍या स्पाईस हॉटस्पॉट या कंपनीसोबत करार करून ऑफलाईन विक्रीचे दालन सुरू केले आहे. या अंतर्गत स्पाईसच्या विविध शो-रूम्समध्ये फ्लिपकार्टवरील स्मार्टफोन ग्राहकांना हाताळण्यासाठी उपलब्ध करण्यात येतील. येथे ग्राहक प्रत्यक्ष ते उपकरण पाहू शकेल. याच्या फंक्शन्सची माहिती मिळवू शकेल. यानंतर तो तेथेच स्मार्टफोनवरून ऑर्डर देऊन एक तर तेथेच संबंधीत मॉडेल मिळवू शकेल. अथवा त्याला ते आपल्या घरी मिळू शकेल. त्याला स्मार्टफोन ऍपवरून ऑर्डर देतांना काही अडचण आल्यास स्पाईसचे कर्मचारी मदत करतील. या माध्यमातून फ्लिपकार्टने आपला ऑफलाईन पाया पक्का करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. प्रारंभी स्पाईस हॉटस्पॉटच्या निवडक शो-रूममध्ये ही सुविधा असेल. यानंतर मात्र सर्व शॉपीजमध्ये ही ऑफलाईन विक्री प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...