Thursday, 5 November 2015

फेसबुक बनतेय बातम्यांचा मुख्य स्त्रोत

फेसबुक ही सोशल साईट जगभरात बातम्यांचा प्रमुख स्त्रोत बनत असून या क्षेत्रातील गुगलच्या मिरासदारीला आता सुरूंग लागल्याचे parsely या साईटच्या निरिक्षणातून दिसून आले आहे.

     
   जगभरात सध्या पारंपरिक प्रसारमाध्यमांसोबतच सोशल मीडियादेखील बातम्यांचा प्रमुख स्त्रोत बनला आहे. आजवर गुगलच्या माध्यमातून बातम्यांकडे वापरकर्त्यांची ‘ट्रॅफिक’ वळत होती. आता मात्र फेसबुक अव्वलस्थानी विराजमान झाले आहे. parsely या डाटा ऍनालिसीस करणार्‍या आघाडीच्या कंपनीने जुलै २०१५ अखेरीसचे रिझल्ट आज जाहीर केले आहेत. यात जगभरातील तब्बल ४३ टक्के बातम्या फेसबुक या सोशल साईटच्या माध्यमातून युजर्सपर्यंत पोहचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे गुगल प्रथमच पहिल्या स्थानावरून दुसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहे. गुगलच्या माध्यमातून ३८ टक्के बातम्या जगापर्यंत पोहचत असल्याचे यात दर्शविण्यात आले आहे. उर्वरित १९ टक्क्यांमध्ये ट्विटर तसेच अन्य सर्च इंजिन्सचा समावेश आहे.

  parsely ने आपल्या सर्व्हेक्षणात जगातील आघाडीच्या ४०० पारंपरिक आणि सोशल मीडिया संस्थांचे विश्‍लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. यात वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल साईटस, ब्लॉग्ज, न्यूज पोर्टल्स, वृत्तसंस्था आदींचा समावेश होता. यात फेसबुकवर वृत्त शेअर करणे हे युजर्सला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सर्वात महत्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. म्हणजे ‘गुगल सर्च’ सोबत आता फेसबुक या सोशल साईटकडे दुर्लक्ष करणे कुणाही वृत्त प्रकाशकांना परवडणारे नाही. म्हणजेच डिजीटल मार्केटींगमध्ये फेसबुकचे स्थान अजून मजबुत बनले आहे हे निश्‍चित.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...