Friday, 29 September 2017

पीएफ बॅलन्स जाणून घ्या इंटरनेटशिवाय. check Epf Balance without internet

नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. पीएफ मधील पैसे निवृत्तीपर्यंत न काढण्याचा अनेकांचा मानस असतो. मात्र पीएफ मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेणे कठीण होते. परंतु, हे काम आता सोपे झाले आहे. पीएफ मध्ये जमा झालेल्या रक्कमेचा आकडा जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही खास करण्याची आवश्यकता नाही. 

तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती कळेल. 

पीएफ अकाऊंटशी जोडल्या गेलेल्या (रजिस्टर असलेल्या) मोबाईल नंबर वरून ०११-२२९०१४०६ या नंबरवर मिस कॉल द्या. मिस कॉल दिल्यानंतर काही वेळातच तुमच्या मोबाईलवर बॅलन्स सांगणारा एक मेसेज येईल. 

     याव्यतिरिक्त ईपीएफओ एसएमएस सेवेच्या माध्यमातून देखील तुम्हाला पीएफ अकाउंटमध्ये असलेल्या रकमेविषयी माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला ०७७३८२९९८९९ या नंबरवर एसएमएस करावा लागेल. परंतु, ज्यांनी यूएएन अॅक्टिव्हेट केलंय त्यांनाच ही सुविधा उपलब्ध होईल. एसएमएस पाठवताना मेसेज बॉक्स मध्ये EPFOHO UAN टाईप करा. त्यानंतर ज्या भाषेत माहिती हवी असेल त्या भाषेची पहिली तीन अक्षरे लिहा. उदारणार्थ- EPFOHO UAN ENG असे लिहून ०७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवा. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती मिळेल. 

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...