Sunday, 25 February 2018

आता भारतातही डाऊनलोड होणार प्रती सेकंदाला १४ जीबी डाटा

        नुकत्याच ओपनसिग्नल या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने केलेल्या यादीनुसार भारतातील ४ जी स्पीड जगात सर्वात कमी आहे. आपल्या देशापेक्षा पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनिशिया सारख्या देशांचा ४ जी स्पीडही जास्त आहे. यावर मोबाईल वापरकर्ते यांच्यात नाराजी आहे. परंतु हे चित्र आता लवकरच बदलनार आहे. भारताचा जी सॅट - ११ होणार असून यामुळे एका सेकंदाला ३ चित्रपट सहज डाउनलोड करणे शक्य होणार आहे.
      येत्या मे   महिन्यात स्वदेशी बनावटीचा उपग्रह इस्रोने ( भारतीय अंतराळ संस्था) तयार केलेला जी सॅट - ११ 'एरियन' हि फ्रांसची अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाचे वजन ५७०० किलो आहे. हा उपग्रह आतापर्यंतचा सर्वात अवजड उपग्रह असणार आहे.या उपग्रहामुळे भारताकडे स्वतः चे सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट आहे.
      भारतातील इंटरनेटच्या स्पीड बाबत आकामाई टेक्टोनॉजी ने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, 6.5 एमबीपीएस प्रती सेकंद या वेगाने जगात 8 9 वा क्रमांक लागतो. मात्र जी सॅट - ११ या भारतीय बनावटीच्या उपग्रहामुळे हा डाटा पाठविण्याचा स्पीड १४ जीबी पर्यंत होणार असून इंटरनेट जोडण्याही स्वस्त होणार आहे. यामुळे डिश टीवी न लावता आपण टिव्हीवरील प्रोग्राम पाहू शकतो.

How To send Large File From E - mail

Friends, इमेल का Use आज हर कोई करता है. आज कोई File या फिर Document हो तो हम Use Email से Send करते है. लेकीन जाब File कि Size 2...